Friday, November 29, 2013

कैसी तेरी खुदगर्जी?

"कैसी तेरी खुदगर्जी, ना धूप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्जी,कैसे ठोर टिकेना पांव

बन लिया अपना पैगंबर, 
तर लिया तू सात समंदर
फिर भी सूखा मन के अंदर...

रे कबिरा मान जा, 
रे फ़किरा मान जा....
आजा तुझको पुकारे तेरी परछाईया..."

मोजक्या शब्दात एक मोठी कहाणी एक गाणंच सांगू शकतं. अशा बोलक्या ओळींना सुरांची साथ मिळाली की कधी कधी एक अस्सल मिश्रण तयार होतं अगदी या गाण्यासारखं.

"ये जवानी है दिवानी" चं गाणं आज पहिल्यांदा व्यवस्थित ऐकलं आणि पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय नाही राहवलं. गाण्याच्या ओळींत एक विषण्ण व्यथा जाणवते. व्यथा एका भटक्या चंचल मनाची जे सगळं मनासारखं करत राहतं तरीपण असंतुष्ट, अपुरं राहतं. कुठून येतो हा अपूरेपणा, प्रत्येक वेळेला हवा तो मार्ग निवडून पण? असं तर नाही ना की हे अपुरेपण कुठेतरी मनातल्या आत लपलेल्या अपूर्ण ईच्छेने येतं?

आपण कितीही प्रयत्न केला अलिप्त राहून सुखी राहण्याचा मुखवटा चढवण्याचा तरी आपल्या आतल्या आवाजापासून आपण नाही अलिप्त राहता येत ना?

"Wake up Sid" चा इकतारा पण असाच मनाला भिडतो.  कबिरा ऐकताना पटकन इकतारा समांतर येतो आणि एक connection होतं. अमिताभ भट्टाचार्य आणि तोची रैना यामागे आहेत म्हणजे ते connection पक्कं आहे.

त्यातल्या एकट्या रात्रीचं वर्णन आणि त्या एकट्या रात्रीला जवळ घेउन जागणाय्रा मनाचा विखार कल्पनेनं नाही अनुभवता येत. तो मनापासून जाणवावा लागतो. तो  कळला की आपोआपच कळतो हा चंचलपणा मनात कुठून येतो आणि कशाने मन का परिंदा कायमचा बंजारा होतो ते :)

 कैसी तेरी खुदगर्जी चं उत्तर  शेवटी बंजारा परिंदा देउन जातो...