Wednesday, August 05, 2009

अज्ज दिन चढेया ...(Ajj Din Chadeya)

काही गोष्टी किती सरळसोप्या असतात. पण कुठेतरी मनात आत भिडतात. Love Aaj Kal मधल हे गाणं असच कुठेतरी आत घुमलं.
बघायला गेलं तर टिपीकल मेलोड्रामॅटिक, व्यावसायिक चित्रपटातील अजून एक गाणं; पण सुरेख!

नेहमीचा एक सीन...तो लांबचा प्रवास करुन तिला पहायला येतो. ती भेटेल की नाही, त्याला पाहेल की नाही, त्याच्याशी बोलेल की नाही, याचा काही विचार न करता, फक्त येतो. त्याच्याकडे असतो फक्त तिचा पत्ता आणि तिला भेटायची आस. सकाळ होण्याची वाट बघत घरासमोरील एका बाकावर तो रात्र काढतो...

(सकाळ किती प्रतिकात्मक असते आपल्यासाठी. आजचा दिवस जर मनासारखा नसेल, तर रात्री झोपताना नाही का वाटत कि उद्या काही मनासारखं घडू दे. सुर्य तोच असतो, दिवस तोच असतो. पण किती वेगळा वाटतो!)

हळुहळू दिवस वर येतो. त्याचा डोळा उघडतो आणि एक चमक दिसते त्यात...तो क्षण जवळ आल्याची चाहूल लागते...तो दिवस नवीन असतो..अगदी रात्री मनात आणला तसा...अलगद सुरू झालेल्या गाण्यात ते आपल्याला जाणवून देउ लागतो...मनातली घालमेल जेव्हा वाढते, तेव्हा मग देवाला साद घातली जाते आणि त्याला या गाण्यात साकडं घातलं जातं.

अज्ज दिन चढेया तेरे रंग वरगा,
फूल सा खिला है आज दिन...
रब्बा मेरे दिन ये ना ढले, वो जो मुझे ख्वाब मे मिले,
उसे तू लगा दे अब गले, तैनू दिल दा वास्ता...
रब्बा आया दर दिगार के, सारा जहान छोड के,
मेरे सपने सवार दे, तैनू दिल दा वास्ता...

बक्षा गुनाहो को, सुन के दुवाओको
रब्बा प्यार है तुने सब को ही दे दिया
मेरी भी आहोंको, सुन ले दुवाओंको
मुझको वह दिला मैने जिसको है दिल दिया
आसमां पे आसमां उसके दे इतना बता
वो जो मुझे देखके हसे, पाना चाहू रात-दिन उसे
रब्बा मेरे नाम कर उसे, तैनू दिल दा वास्ता...

मांगा जो मेरा है, जाता क्या तेरा है
मैने कौनसी तुझसे जन्नत है मांग ली
कैसा खुदा है तू, बस नाम का है तू
रब्बा जो तेरी इतनी सी भी ना चली
चाहिये जो मुझे, कर दे तू मुझको अता
जिती रहे सल्तनत तेरी, जिती रहे आशिकी मेरी
देदे मुझे जिंदगी मेरी, तैनू दिल दा वास्ता...

रब्बा मेरे दिन ये ना ढले, वो जो मुझे ख्वाब मे मिले,
उसे तू लगा दे अब गले, तैनू दिल दा वास्ता...

रब्बा आया दर दिगार के, सारा जहान छोड के,
मेरे सपने सवार दे, तैनू दिल दा वास्ता...
अज्ज दिन चढेया तेरे रंग वरगा,
फूल सा खिला है आज दिन...

शेवटी ती येते आणि त्यांची नजरानजर होते. तिच्या नजरेतल्या आश्चर्याने त्याला जाणवतं की त्याचं येणं सार्थकी लागलय... हवं ते मिळाल्याचा आनंद त्याला भारुन टाकतो.

काहीतरी हवं असणं आणि ते मिळणं यालाच तर सुख म्हणतात ना? काय हवं असतं याच्या व्याख्या प्रत्येक जण वेगळ्या बनवतो मात्र. संन्यास घेणारा योगी म्हणतो की त्याला कसलाही मोह नाही, काही नकोय त्याला. पण काही नको असणं हे देखील काही हवं असणं नाही का?

वरचं गाणं जेव्हा सुरु झालं, तेव्हा मला एक प्रकारचा "Deja Vu" झाला होता. असं वाटत होतं की पुढचं गाणं मनात वाजतय आधी. का ते कळेना. घरी आल्यावर मी ते चक्क विसरलो होतो. पण सकाळी उठलो तेव्हा मनात कुठेतरी ते घुटमळत होतं पण. मनात घुटमळणारं गाणं नक्की कोणतं हे कळत नव्हतं पण. नुकतंच TV वर येणाय्रा "दिन है सुहाना आज पहली तारिख है" च्या ओळी आणि चाल मध्ये येत होती.
थोडयावेळाने सवयीप्रमाणे लॉगीन केलं आणि Love Aaj Kal ची गाणी डाउनलोड केली. जितकी मिळाली ती सगळी. रांगेने लावली तेव्हा हे अचानक लागलं. डोक्यात फिरणारं आणि प्ले होणारं गाणं मॅच झालं आणि एक शोध पुर्ण झाल्याचा आनंद झाला...अंगावर काटा आला.

त्या क्षणाला हवं असलेलं काहीतरी गवसलं आणि एक वर्तुळ पुर्ण झालं.