Tuesday, October 26, 2010

Discrimination at Indian luxury Hotels

Had been to a luxury hotel to meet a friend. I was initially suprised since I was allowed to park inside their compound. While leaving, I rode up through the porch and two guards instantly came forward to stop me.

Guard - "Stop, Exit is that way"
Me - "Yes, I know, but I have to pick up somone from the porch!"
Guard - "Bikes allow (sic) nahi hai sir. (Bikes are not allowed)"
Me - "Why, I am not going to live there forever, will just pick up and go."
Guard - "But sir..."

I did not stop to argue further with the guards and went ahead through the porch.

All cars were allowed, no matter how cheap or underpowered they were. I wonder if he would have stopped a foreginer, or a guy on a superbike in same place.

What kind of discrimination is this? This is plain stupidity or just another example of socio-economical beliefs engraved in Indian minds. Or is this reflection of moronic understandings of people who made these rules?

Sunday, October 24, 2010

Handsoff!

They recently installed this Shoe polisher machine in the office washroom. And instantly people were seen using those and at times queing up.
I wondered how they realised that they need polish after this machine was installed. Or perhaps it was just the novelty factor :)

PS: I admit that I couldn't control temptation and I tried it out too ;)

Saturday, October 23, 2010

"सिंहासन"च्या निमित्ताने भूतकाळात डोकावताना...

नुकतच कुणीतरी सुचवलं की "सिंहासन" बघ. जुना आणि मस्त पिक्चर आहे म्हणून. आता तो कुठून मिळवायचा हा प्रश्न गूगलबाबांनी चुटकीसरशी सोडवला. TPB वर एकजण चक्क seed करत होतं. वेळ न दवडता download केला. १९८० म्हणजे माझं जन्मवर्ष. त्यावेळचं आता काही फारसं आठवत नाही त्यामुळे त्यावेळचा चित्रपट बघायची उत्सुकता खुप होती. त्यात राजकारण म्हणजे अजुनच.

चित्रपट उत्तमच, "जाने भी दो यारो" च्या पठडीतला. अनेक दिग्गजांनी भरलेला. राजकारणाचं अप्रतिम चित्रण आणि सुरेख संवाद. राजकारण फारसं बदललेलं नाही (अफरातफरीचे आकडे सोडले तर). चित्रपट जसाच्या तसा आज पुन्हा आणता येउ शकतो.

पण त्या काळचं एक प्रतिबिंब किंवा documentary evidance म्हणून पाहिला तर जुन्या गोष्टी बघायला मिळतात. त्यापैकी काही खाली देत आहे...

गांधीटोपी आणि शबनम घेऊन फिरणारी लोकं

लोलकाची घडयाळं आणि त्यातल्या काचेवर नक्षीकाम,
सलूनमधली पाण्याची फवारा करण्याची बाटली (तिच्या नळीला असलेल्या गोफात बोट घालून पाणी फवारले जायचे)

जुने काळे फोन. प्रत्येक मुख्य पात्र एकदा तरी फोनवर बोलतान दिसतं यात. (आजोबा त्यावेळच्या BSNL मध्ये कामाला होते आणि आमच्याच इमारतीत त्यांचं ऑफीस त्यामुळे असे फोन म्हणजे आमची खेळणी होती!)

खिळे लावून छापलेले पेपर. शब्दांमधली जुळणीची फट सहज दिसते

टेबलावर ठेवलेली मोठी काच, त्याखाली कागद, टेबलावर फायली आणि काचेचे पेपरवेट्स

भिंतीवरून केलेली लाकडी पट्टीवरची वायरींग आणि पंख्यासाठीचे मोठे रेग्युलेटर्स

अल्युमिनीयमचे भांड्यांचे स्टॅंड्स आणि डालड्याचे "रीयुजेबल" डब्बे. डालडा संपला की त्याची जागा डाळी घ्यायच्या.

नक्की कळत नाहीये, पण मला वाटतं हा वरळी सी फेस आणि मागे सी रॉक हॉटेल दिसतंय

विधान भवन, इंडियन एक्स्प्रेस टॉवर

पुठ्ठ्याचे कॅलेंडर, त्यांच्या खाली प्रत्येक तारखेचा एक कागद. तारीख सहसा मराठी, इंग्रजी आणि गुजरातीत, तिथीविशेषासकट. दिवस उलटला की आदल्या दिवसाचा कागद फाडायचा. पुठ्ठ्यावर एखादा देवाचा,मुलाचा किंवा मस्त बाईचा फोटो!




न ओळखता येणारे मुंबईचे रस्ते






ए-एम ट्रांझिस्टर्स/रेडियो/टेप रेकॉर्डर

बेल-बॉटम पॅंट्स, मोठ्या छापाचे कपडे, लांब कल्ले आणि "हॅंडलबार मिशा"
फियाट

मॅटॅडोर वॅन

Tuesday, October 12, 2010

Commonwealth Fail! - खेल खतम, पैसा हजम?

Commonwealth Games मधली भारताची पदक-कमाई पाहता कलमाडी कंपनी सहज सुटेल असंच वाटतय.

पाहुण्यासमोर लाज जाऊ नये असं मानून काम करणारी बरीच लोकं अजून आहेत आपल्याकडे.अश्या लोकांनीच बहुधा ओढून ताणून कशीबशी तयारी पूर्ण केली. सगळंच तयार आहे आणि आलबेल आहे अशातला भाग नाही. झाल्या प्रकाराने आपली परदेशात लाज जायची ती गेलीच आहे.

माझ्यासारख्या बहुतेकांना वाटलं होतं की खेळ सुरु होऊ शकणार नाहीत, झाले तरी आपण काही खास करू शकणार नाही आणि त्यामुळे तरी कलमाडी कंपनीवर कारवाई होईल. कलमाडी कंपनीने राजीनामा न देता खेळ सुरु होईपर्यंत शिताफीने रेटलं आणि लढाई अर्धी जिंकली.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर येणारे खेळाडू नक्कीच कौतुकास पात्र ठरतात.  पण खेळाडूंनी मिळवलेल्या यशाच्या झोतात आता कलमाडी सुटले नाही म्हणजे मिळवलं.