प्रत्येक सिग्नलवर आज तिरंगा विकेल
तो विकणारा आज २ पैसे जास्त बांधेल
घेणारा म्हणेल, आज मला अभिमान आहे,
कि भारत एक स्वतंत्र देश आहे.
एके काळी रक्त सांडलं स्वदेशीसाठी,
आज आपल्या मनात फोरेनला भाव आहे,
कोण म्हणतो ही गुलामी आहे?
मनात आणा, कार्ड फिरवा, परदेशातला उत्तम माल हजर आहे.
काय घ्यायचं, काय नाही, ठरवायला मी मुखत्यार आहे
कारण, भारत एक स्वतंत्र देश आहे.
तेव्हा प्राण दिले देशासाठी, आपला माणसाच्या खाली राबण्यासाठी.
आज गोर्या बाईला सलाम आहे आणि तिच्या हुजरीत दरबार-ए-खास आहे.
तिला डोक्यावर बसवणारा निर्णय माझाच आहे,
कारण, भारत एक स्वतंत्र देश आहे.
आज जिकडे तिकडे भ्रष्टाचार आहे, हावरट नेता मोकाट आहे
उघड्यावर रक्ताचे पाट वाहणारा बिर्याणी खातोय
आणि उघड्यावर पाण्याची वाट बघणारा गोळी खातोय.
शेतात विज बेपत्ता आहे, आणि मंत्र्यांच्या बंगल्यात लखलखाट आहे.
याचा जाब विचारायला कुणाला वेळ आहे?
खरंच भारत एक स्वतंत्र देश आहे?
काय कमवलं स्वातंत्र्यापायी?
काल बाहेरचा नासवत होता,
आज आपल्याच माणसासमोर हार आहे
तरी १ दिवस झेंडा मिरवायला मन आज खुश आहे,
खरंच भारत एक स्वतंत्र देश आहे?