Friday, May 07, 2010

प्रतापगडाचा जिर्णोद्धार - एक स्तुत्य प्रकल्प

IMG_4042

लोकसत्तामध्ये छापलेल्या ३ लेखांची जोड येते देत आहे.महाराजांचा वारसा मिरवणारे बरेच आज स्वत:ला महाराज आणि राहत्या घराला रायगड बनवण्यात गुंतले आहेत. महाराजांचे नाव पुढे करुन जनतेला त्यांचा विसर व्हावा हा त्यामागचा उद्देश असल्याचे वाटल्यास नवल नाही. निवडणुका, स्व-प्रतिष्ठा आणि छानछौकीसाठी करोडो पैसा खर्च करणार्‍यांनी असल्या कामासाठी पैसा खर्च केल्याचे मला ऐकिवात नाही.
सागरी पुतळ्यासाठी ३०० करोड खर्च करण्यास तयारी आहे पण मग ज्या दगड-मातीत महाराजांनी स्वराज्य खरोखर घडवले ते असे उपेक्षित का??