Tuesday, August 03, 2010

कोंबडी वडे इन ठाणे...

Facebook वर एकाने टाकलेला मालवणी थाळीचा फोटो पाहीला आणि माझ्यात कॊंबडी वड्यांचा राक्षस जागा झाला.

तसं खाऊन जास्त दिवस नाही झालेत. हल्लीच रत्नागिरी रपेट केली तेव्हा चिपळूणला मुद्दाम अभिषेकमध्ये थांबलॊ होतो. पण पापी पेटको कौन समझाये. आत्ता तलफ़ आली तर भागवावी तर लागेल ना?

जरा इंटरनेट धुंडाळलं आणि घराजवळच विजयदुर्गचा पत्ता मिळाला. जाउया पाहून म्हणालो आणि गेलो.
मस्तं दोन प्लेट वडे हादडले आणि खुश झालो. आनंद चेहर्‍यावर लपत नव्हता.
विजयदुर्ग approved!!!

घरी आलो आणि आईचा फोन - रविवारी मटण-वडे, खास गटारीनिमित्त! याला म्हणतात आंधळा मागतो एक वडा आणि देव देतो दोन :D