Commonwealth Games मधली भारताची पदक-कमाई पाहता कलमाडी कंपनी सहज सुटेल असंच वाटतय.
पाहुण्यासमोर लाज जाऊ नये असं मानून काम करणारी बरीच लोकं अजून आहेत आपल्याकडे.अश्या लोकांनीच बहुधा ओढून ताणून कशीबशी तयारी पूर्ण केली. सगळंच तयार आहे आणि आलबेल आहे अशातला भाग नाही. झाल्या प्रकाराने आपली परदेशात लाज जायची ती गेलीच आहे.
माझ्यासारख्या बहुतेकांना वाटलं होतं की खेळ सुरु होऊ शकणार नाहीत, झाले तरी आपण काही खास करू शकणार नाही आणि त्यामुळे तरी कलमाडी कंपनीवर कारवाई होईल. कलमाडी कंपनीने राजीनामा न देता खेळ सुरु होईपर्यंत शिताफीने रेटलं आणि लढाई अर्धी जिंकली.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर येणारे खेळाडू नक्कीच कौतुकास पात्र ठरतात. पण खेळाडूंनी मिळवलेल्या यशाच्या झोतात आता कलमाडी सुटले नाही म्हणजे मिळवलं.