Thursday, January 28, 2010

भक्तिमागचा "भाव"


शिर्डी संस्थानातर्फे VIP दर्शनासाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णायाचे भक्तांनी स्वागत केलंय (असं media वाले म्हणत आहेत). निर्णय एका रितीने नक्कीच स्वागतार्ह आहे.

VIP "भक्तां"ना होणारा त्रास आता कमी होईल. उगाच दर्शनासाठी VIP ओळखी "काढाव्या" लागणार नाहीत त्यांना. आजकालच्या जमान्यात ५०० रुपये म्हणजे कीस झाड की पत्ती!

अशा ओळखी "काढून" पासापुरते अजीजी करणारे नातेवाईक, VIP लोकांना आता कमी त्रास देतील. त्यांना पण काय कमी व्याप आहेत? निदान हा तर कमी होईल.

आणि संस्थानाच्या झोळीत या योजनेद्वारे नक्कीच वाढीव भर पडेल. ही योजना आपण आधी का नाही काढली याचा विचार त्याना पडला नसेल तर आश्चर्य.

५०० रुपये मोजून जर राजरोस दर्शन मिळत असेल तर VIP pass  घेणारे आता वाढतील. सामान्य भक्तांना या निर्णयाने कमी त्रास होईल ही आशा मात्र चुकीची ठरेल. सामान्यांचा विचार करायला कोणाला वेळ आहे. हे तेच संस्थान आहे ज्याने साईबाबा मंदिरांचे पेटंट घेण्याची शक्कल लढविली होती.

नुसते हेच संस्थान नव्हे तर इतर अनेक आहेत. तिरुपती आहे. इतकच कशाला अगदी गल्ली गल्लीतील देवळं देखील देवांची direct franchisee असल्याच्या जोशात असतात.  देवाचं दैवत्व मूर्तीतील दगडात मर्यादित नसतं पण नेमकं हेच लोकांच्या मनातून उतरवणं हा एक यशस्वी उद्योग झालाय. याचं ताजं उदाहरण म्हणजे पवईतील रस्ता नूतनीकरण अडवून धरणारे मारुती मंदिर.

सगळा पैश्यांचा खेळ झालाय. बरंय, भक्ति"भाव" आता शब्दश: खरा होईल...