Monday, November 09, 2009

जाहिरातबाजीचे राजकारण आणि राजकारणाची जाहिरातबाजी

लहानपणीचा एक विनोद...

पहिला: अरे माझा मोती कुत्रा हरवला रे
दुसरा: काळजी करु नको, आपण पेपरात "हरवला आहे" अशी जाहिरात देउया!
पहिला: वेडा आहेस काय, त्याला पेपर कुठे वाचता येतो?
आजकाल गल्लोगल्ली लागलेले शुभेच्छा आणि अभिनंदनाचे फलक पाहिले की मला हा विनोद आठवतो.

हे फलक ज्याच्यासाठी लावतात ती व्यक्ती ते कधी वाचत असेल काय? शक्यच नाही. पण जो ते लावतो त्याची पब्लिसिटी मात्र होते. आपले कसे "जिव्हाळ्याचे संबंध" वरपर्यंत आहेत हे दाखवण्याचा आणखी एक हेतू त्यात असतो. राजकारणात पाय रोवू पाहणारे उगवते तारे आपली "निष्ठा" दर्शवण्यासाठी त्यांचा हमखास उपयोग करू शकतात. तसेच, कोण किती काम करतोय हे "दाखवण्यासाठी" अजून सोपा मार्ग दुसरा कुठला असेल?

एवढं असेल तर शहराची स्वछता, नियम, सुरक्षा, पैशांचा दुरुपयोग ईत्यादी दुय्यम गोष्टी कोण कशाला विचारात घेतो?