Wednesday, February 17, 2010

खेळ मांडला!

नटरंग पाहून थोडे दिवस झालेत पण गाणी अजून मनातून जात नाहियेत. कथेला अनुरूप असणार्‍या चपखल ओळी पात्रांच्या भावना अगदी अचूक समोर ठेवतात. "खेळ मांडला" गुणाच्या मनातील विखार असाच समोर आणतं. अशी एकाकीपणाची आणि हतबलपणाची परिस्थिती जेव्हा खरंच कुणावर येते तेव्हा काय होत असेल हा विचार ऐकताना अनेक वेळा मनात येऊन गेला!

तुझ्या पायरीशी कुनी सान-थोर न्हायी
साद सुन्या काळजाची तुज्या कानी जाई
तरी देवा सरंना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट, दिशा अंधारल्या धाई

ववाळूनी उधळतो जीव मायबापा
वणवा ह्यो ऊरी पेटला...

खेळ मांडला-२
खेळ मांडला देवा, खेळ मांडला

सांडली का रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तु र्‍हा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला

उसवलं गनंगोत सारं
आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जिनं
अंगार जिवाला जाळी

बळ दे झिजाया, किरपेची ढाल दे
इनवती पंचप्राण, जिव्हारात ताल दे

करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला

खेळ मांडला-२
खेळ मांडला देवा, खेळ मांडला